चालला तू आपल्या मित्रान बरोबर, हसरे सगळे, मस्त मस्ती करत करत. हळूच मागे वळून, शोधलं मला, “ये न ग…” डोळे तुझे म्हणून गेले… मन माझा गेला थांबून, “यायचय मला” सांगून राहिला, अाग्रहाची गरज नाही तुझ्या डोळ्यांकडनं, पण विचारलं त्यांनी, हा विचारच किती… मी अाले ना अाले, फरक आता पडत नाही, तुझं विचारणच् जणु, सगळं काही…
You are browsing archives for